अनुराधा धावडे
स्वातंत्र्यापासून आजतागायत भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये 1947 पासून कटुता सुरू आहे.
स्वातंत्र्यानंतर दोन्ही देशांमध्ये अनेकदा छोट्या-मोठ्या चकमकी झाल्या. पण 1965 मध्ये भारत आणि पाकिस्तान मध्ये मोठे युद्ध झाले.
भारतीय सैन्याच्या अद्वितीय पराक्रम गाजवत पाकिस्तानी सैन्याची धूळधाण उडवली होती.
या युद्धात पाकिस्तान आपला सपशेल पराभव दिसल्यानंतर इतर देशांच्या मध्यस्थीने हा करार करण्याचा प्रस्ताव मांडला.
10 जानेवारी 1966 रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात ताश्कंद येथे 'ताश्कंद करार' हा शांतता करार झाला.
आज या कराराला ६६ वर्षे पूर्ण झाली आहेत.
या करारानुसार भारत आणि पाकिस्तान आपापल्या शक्तीचा वापर करणार नाहीत आणि त्यांचे वाद शांततेने सोडवतील, असा निर्णय घेण्यात आला.
तसेच 25 फेब्रुवारी 1966 पर्यंत दोन्ही देश सीमारेषेवरून आपले सैन्य मागे घेतील आणि युद्ध सुरु होण्यापुर्वी ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी जातील असे या करारात ठरवण्यात आले
4 ते 10 जानेवारी 1966 मध्ये ताश्कंद येथे झालेल्या बैठकीत संयुक्त राष्ट्रे, अमेरिकी सरकारचे प्रतिनिधी आणि सोव्हिएत रशियन सरकारचे वरिष्ठ प्रतिनिधी सहभागी झाले होते.
हा करार 4 जानेवारी 1966 रोजी सुरू झाला आणि 10 जानेवारी 1966 रोजी पाकिस्तानचे अध्यक्ष अयुब खान आणि भारताचे तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी स्वाक्षरी केली.