Aslam Shanedivan
रायगडच्या पालकमंत्रिपदावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडून दावा करण्यात आल्याने भरत गोगावले आणि सुनील तटकरे यांच्यात वाद होताना दिसत आहे
दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोगावले यांच्या मनातील खदखद पाहत त्यांना ध्वजारोहणाचा मान दिला आहे.
दरम्यान पालकमंत्रिपदाचा तिढा सुटलेला नसतानाच प्रजासत्ताक दिनाला ध्वजारोहणाचा मान कोणाला असा सवाल अनेकांच्या मनात पडला होता
भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 77 वा वर्धापन दिन रायगड–अलिबाग येथे पोलीस कवायत मैदानावर उत्साहात साजरा झाला.
अखेर आज गोगावले यांनी रायगड जिल्ह्याच्या मुख्यालयावर ध्वजवंदन केले असून त्यांचे आता फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.
यावेळी पोलिस दलाकडून शानदार संचलन, राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली.
तसेच विविध क्षेत्रातील गुणवंतांचा गौरव रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी मंत्री भरत गोगावले यांनी फिकट गुलाबी फेटा आणि ऑफ व्हाईट क्रिम कलरचा कोट पेहरावा केला आहे
यावेळी ध्वजारोहणाचा मान मिळाल्याने मंत्री गोगावले प्रसन्न दिसत असून त्यांचे विविध फोटो आता व्हायरल होताना दिसत आहेत.
'बंधेज साफा'अन् 'बंद गला जॅकेट'; प्रजासत्ताक दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'राजेशाही' लूकने वेधले सर्वांचे लक्ष