Rashmi Mane
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला.
अजित पवारांसह आठ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.
मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या नऊ आमदारांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादीकडून जयंत पाटील यांनी विधानसभेच्या अध्यक्षांकडे केली.
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन येत्या १७ जुलैपासून सुरू होणार आहे.
अधिवेशनाच्या तोंडावरच शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादी कुणाची? हे ठरवण्यासंदर्भातील पेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर असणार आहे.
आता पावसाळी अधिवेशनादरम्यान राष्ट्रवादीत 'व्हीप'वरून वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विधीमंडळ अध्यक्षांसमोर राष्ट्रवादीच्या आमदारांच्या सभागृहातील आसन व्यवस्थेबाबतचाही प्रश्न असणार आहे.
याआधी शिवसेनेच्या आमदारांचा प्रश्न अध्यक्षांकडे प्रलंबित असतांना आता राष्ट्रवादीच्या आमदारांचा मुद्दाही विधानसभा अध्यक्षांसमोर असणार आहे.