अनुराधा धावडे
सांगली जिल्ह्यात संदिप पाटील यांचा जन्म झाला. सातारच्या सैनिक स्कूलमध्ये त्यांचं शिक्षण झाले.
त्यांनी NDA मध्ये प्रवेश घेतला. पण शारिरीक चाचणीतून ते बाहेर पडले. त्यानंतर इस्लामपूरच्या कॉलेजमधून त्यांनी इंजिनीयरींग पुर्ण केलं. प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी त्यांनी दिल्ली गाठली आणि चांगल्या मार्कांनी पासही झाले.
त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिल नाही. IPS झाल्यानंतर त्यांना महाराष्ट्र केडर मिळालं. याच काळात त्यांनी लव्ह मॅरेजही केलं.
चंद्रपुरमध्ये त्यांची पोस्टींग झाली, या काळात त्यांनी पोलीस खात्यात भूसुरंग शोधण्यासाठी खास पथक तयार केले. त्यासाठी त्यांनी ६० पोलिस स्टेशनमधील पोलिसांना खास प्रशिक्षणही दिले.
विशेष म्हणजे संदीप पाटील यांनी स्वत:हून गडचिरोली जिल्ह्यात पोस्टींग मागून घेतली.
नक्षलवादी भागात संदिप पाटलांनी सर्वांत महत्त्वाचं काम केलं ते म्हणजे लोकशाहीची पेरणी.
नक्षलवादी भागात त्यांनी आत्मसमर्पण योजना सुरु केली. त्यांच्या काळात तब्बल 174 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करत मुख्य प्रवाहात आले.
त्यांच्या कामामुळे राज्यभरात त्यांचा नावलौकिक वाढू लागला. लोक स्वत:हून येऊन त्यांना भेटू लागले.
भेटायला येणाऱ्या लोकांना त्यांनी 'बुके नको बुक द्या' असं आवाहन केलं. लोकांकडून मिळालेली ही पुस्तके त्यांनी ज्ञानाची शिदोरी म्हणून गडचिरोलीला पाठवली.