Sharmishtha Walavalakar : सहा महिन्यात अँटी करप्शनच्या 60 कारवाया; 'एसीपी' शर्मिष्ठा वालावलकरांची धडाकेबाज कामगिरी

Rashmi Mane

अधीक्षकपदाचा पदभार

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षकपदाचा पदभार शर्मिष्ठ वालावलकर यांनी स्विकारला सहा महिन्यापूर्वी स्विकारला आहे.

ACP Sharmishtha Walavalakar | Sarkarnama

धडाकेबाज कामगिरी

नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षकपदी नियुक्ती झाल्या पासून शर्मिष्ठा वालावलकर यांनी 45 छापे टाकून 69 लाचखोरांना गजाआड केलं आहे.

ACP Sharmishtha Walavalakar | Sarkarnama

मूळच्या सांगलीच्या

मूळच्या सांगलीच्या असलेल्या वालावलकर यांनी शालेय जीवनातच पोलीस अधिकारी होण्याचे ठरविले होते. 

ACP Sharmishtha Walavalakar | Sarkarnama

कुटुंबिक माहिती

मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या शर्मिष्ठा वालावलकर यांना आठ भाऊ. तरीही मुलगी म्हणून आई- वडीलांनी कधीही वेगळी वागणूक दिली नाही.

ACP Sharmishtha Walavalakar | Sarkarnama

शिक्षण

बी. एस्सी. करत असतानाच त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी केली. २००६ मध्ये 'एमपीएससी'ची पोलीस उपअधीक्षक पदाची परीक्षा दिली, त्यात यश मिळवले.

ACP Sharmishtha Walavalakar | Sarkarnama

नाशिकला ट्रेनिंग

2010 साली पोलीस उपअधीक्षक पदाचे ट्रेनिंग नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये झाले आहे. त्यानंतर पुणे ग्रामीण पोलीस दलात प्रोबेशन झाले. 

ACP Sharmishtha Walavalakar | Sarkarnama

पहिली पोस्टींग

ट्रेनिंग झाल्यानंतर त्यांचे पहिले पोस्टींग उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूरला पोलीस उपअधीक्षक म्हणून झाले. 

ACP Sharmishtha Walavalakar | Sarkarnama

कणखर अधिकारी

पोलीस दलात १३ वर्षांपासून अतिशय कणखर पणे काम करणाऱ्या अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.

ACP Sharmishtha Walavalakar | Sarkarnama

Next: यंदाच्या परीक्षेत मुलींचा डंका ; देशात इशिता किशोर तर राज्यात कश्मिरा संखे प्रथम