सरकारनामा ब्युरो
फलटण येथील राजघराण्याचे रामराजे नाईक-निंबाळकर ८ एप्रिल २०२३ रोजी आपल्या वयाची पंच्याहत्तर वर्षे पूर्ण करीत आहेत.
एलएल. एम. ची पदवी घेतल्यानंतर त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केले. त्यानंतर फलटणच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक उन्नतीसाठी वाहून घेतले.
फलटण पंचायत समितीचे सदस्य, सातारा जिल्हा परिषद सदस्य, फलटण नगरपरिषदेचे नगराध्यक्ष अशी त्यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात झाली.
सन १९९५ ते २००९ असे सलग तीन वेळ ते विधानसभेवर निवडून गेले.
सन २०१० ते २०२२ असे तीन वेळा ते विधानपरिषदेवर निवडून आले आहेत.
कृष्णा खोरे सिंचन विकास महामंडळाचे उपाध्यक्ष, महसूल आणि पुनर्वसन खात्याचे राज्यमंत्री, जलसंपदा (कृष्णा खोरे पाटबंधारे महामंडळ) खात्याचे मंत्री म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली.
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या सभापतीपदी त्यांची दोन वेळा बिनविरोध निवड झाली.
मार्च २०१५ ते जुलै २०२२ या सभापतीपदाच्या कार्यकाळात त्यांनी विधानमंडळात अनेक महत्वपूर्ण उपक्रम राबविले आहेत.