Amol Sutar
अयोध्येत बॉलिवूडची 'ड्रीम गर्ल' हेमा मालिनीचा खास परफॉर्मन्स असणार आहे.
प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान हेमा मालिनी रामायणावर आधारित नृत्यनाटिका सादर करणार आहेत. त्यांनी व्हिडीओ शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे.
प्राण प्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान अनेक सेलिब्रिटी उपस्थित असणार आहेत. यात अमिताभ बच्चन यांचा समावेश आहे. त्यांनी राम मंदिरा जवळच 14 कोटी रुपयांचा प्लॅाट घर बांधण्यासाठी खरेदी केली आहे.
कंगनाला देखील राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच निमंत्रण मिळाल्याचे समोर आले आहे. त्याचा खुलासा कंगना रणौतनं स्वत: सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत केला आहे.
राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी बॉलिवूडमधील अभिनेत्री माधुरी दीक्षित हिला आमंत्रण देण्यात आले आहे.
भाजप नेते अर्जुन मूर्ती यांच्यासह आरएसएसच्या अधिकाऱ्यांनी अभिनेता रजनीकांत यांच्या घरी भेट देवून प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण पत्र दिले.
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनाही प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण मिळाले आहे.
केवळ बॉलिवूडच नाही तर साऊथ स्टार्स प्रभास, यश यांनाही राम मंदिर प्राण प्रतिष्ठा दिवशी आमंत्रित करण्यात आले आहे.
ग्लोबल स्टार राम चरण आणि त्यांची पत्नी उपासना यांना राम मंदिराच्या शुभ अभिषेक सोहळ्याला उपस्थित राहण्याचे खास आमंत्रण सुनील आंबेकर यांनी हैदराबाद येथे त्यांच्या घरी भेट देवून दिले.