Rashmi Mane
पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी (२२ ऑगस्ट) दक्षिण आफ्रिकेच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर गेले आहेत.
दक्षिण आफ्रिकेत त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.
यादरम्यान पंतप्रधान मोदी १५ व्या ब्रिक्स परिषदेत सहभागी होणार असून अनेक जागतिक नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठका घेणार आहेत.
दक्षिण आफ्रिकेचे उपाध्यक्ष 'पॉल माशाटाइल' यांनी 'वॉटरक्लूफ एअर फोर्स बेस'वर मोदींचे स्वागत केले. यावेळी त्यांना 'गार्ड ऑफ ऑनर' देण्यात आला.
पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्यात 15 व्या 'ब्रिक्स' शिखर परिषदेत सहभाग आणि आमंत्रित देशांच्या नेत्यांशी संवाद, असा कार्यक्रम आहे.
'प्रिटोरिया' हिंदू सेवा समाज आणि स्वामीनारायण संस्थानच्या स्थानिक युनिटच्या कार्यकर्त्यांसह भारतीय लोकांनी मोठ्या संख्येने पंतप्रधान मोदींचे स्वागत केले.
राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा यांच्या निमंत्रणावरून मोदी 22 ते 24 ऑगस्टदरम्यान दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहेत.
2019 नंतर आफ्रिका ब्रिक्स देशांच्या (ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका) पहिल्या थेट शिखर परिषदेचे आयोजन करत आहे.