Deepak Kulkarni
पुणे जिल्ह्यातल्या मुळशी तालुक्यातील भुकूम गावात एक कौतुकास्पद व ऐतिहासिक घटना घडली आहे.
गावच्या ग्रामपंचायतीची सरपंच आणि उपसरपंचाची निवडणूक होणार होती.
यावेळी गावातील सर्व सदस्यांनी मिळून ही निवडणूक बिनविरोध करण्याचा निश्चय केला.
भुकूम ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंचपदाचा कारभार आता बहीण-भाऊ पाहणार आहे.
मुळशीच्या भुकूम ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मयुरी आमले यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर उपसरपंचपदी अंकुश खाटपे यांची निवड झाली आहे.
भुकूम ग्रामपंचायतीच्या इतिहासात पहिल्यांदाच मावस बहीण-भाऊ हे सरपंच आणि उपसरपंचपदी विराजमान झाले आहेत.
त्यामुळे या अनोख्या योगायोगाची राज्यात चर्चा रंगली आहे.
दरम्यान, या बिनविरोध निवडीमुळे नवनिर्वाचित सरपंच आणि उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्यांची मिरवणूक गावकऱ्यांनी काढली.