Prakash Singh Badal : 11 वेळा आमदार अन् पाचवेळा मुख्यमंत्री; असा आहे प्रकाशसिंग बादल यांचा राजकीय प्रवास

Sunil Balasaheb Dhumal

स्वांतत्र्य पाहिले

पंजाबचे पाच वेळा मुख्यमंत्री राहिलेले प्रकाशसिंग बादल यांचे २५ एप्रिल रोजी वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झाले. ते स्वांतत्र्याचा दिवस पाहिलेले राजकीय पिढीतील सदस्य होते.

Prakash Singh Badal | Sarkarnama

1927 मध्ये जन्म

बादल यांचा जन्म 8 डिसेंबर 1927 रोजी पंजाबमधील मलोतजवळील अबुल खुराना येथे झाला.

Prakash Singh Badal | Sarkarnama

सरपंच म्हणून निवड

प्रकाशसिंग बादल यांनी 1947 मध्ये राजकारणाला सुरुवात केली. त्यांनी सरपंचाची निवडणूक लढवली आणि जिंकली. ते सर्वात तरुण सरपंच झाले.

Prakash Singh Badal | Sarkarnama

11 वेळा आमदार

1957 मध्ये त्यांनी पहिली विधानसभा निवडणूक लढवली. यानंतर बादल तब्बल 11 वेळा आमदार म्हणून निवडून आले. 1972 मध्ये ते विरोधी पक्षाचे नेते बनले.

Prakash Singh Badal | Sarkarnama

तरुण मुख्यमंत्री

1970 मध्ये बादल पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले. त्यावेळी बादल देशातील सर्वात तरुण मुख्यमंत्री ठरले. यानंतर 1977-80, 1997-2002, 2007-12 आणि 2012-2017 मध्ये ते मुख्यमंत्री होते.

Prakash Singh Badal | Sarkarnama

पक्षाची स्थापना

1986 मध्ये बादल यांनी शिरोमणी अकाली दल (बादल) पक्षाची स्थापना केली.

Prakash Singh Badal | Sarkarnama

शेतकऱ्यांसाठी कार्य

बादल यांच्या सरकारने शेतकऱ्यांवर लक्ष केंद्रित केले. नवीन शेती कायद्यांमुळे त्यांनी भाजपसोबतचे संबंध तोडले. 2015 मध्ये मिळालेला पद्मविभूषण पुरस्कारही परत केला.

Prakash Singh Badal | Sarkarnama

अजातशत्रू

बादल यांनी सर्व पक्षातील सर्व नेत्यांबरोबर मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यांच्याबद्दल राजकीय प्रतिस्पर्ध्यांसह सर्वांच्या मनात प्रेम आणि आदर होता.

Prakash Singh Badal | Sarkarnama

NEXT : वयाच्या 22 व्या वर्षी झाली IAS अधिकारी ; UPSC परीक्षेत 5 वा रँक मिळवत रचला इतिहास