Aslam Shanedivan
आजच्या काळात जवळपास प्रत्येक महत्त्वाच्या कामासाठी आधारकार्ड महत्वाचे आहे.
सरकारी योजना असो, एखादी ऑनलाइन सेवा किंवा प्रवास यासह विविध ठिकाणी आधारकार्डचा वापर केला होतो.
पण अनेकदा आधारकार्डवरचा फोटो खूप जुना असल्यास अनेकांना तोंड द्यावे लागते.
पण आता आधारवरील फोटो बदलण्याचा पर्याय उपलब्ध आहे. घरातूनच अपॉइंटमेंट घेऊन केंद्रावर बऱ्याच कालावधीत आणि तेही रांगेत उभं न राहता फोटो बदलता येतो
यासाठी UIDAIच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन तेथे अपॉइंटमेंट बुक करण्याचा पर्याय निवडा.
यानंतर तुमचं शहर आणि जवळचं आधार केंद्र निवडून मोबाईल नंबर टाका. यानंतर मोबाईलवर आलेला OTP टाका.
अपॉइंटमेंट फिक्स झाल्यावर ती पावती सुरक्षित ठेवा आणि नंतर केंद्रावर जाऊन आधारकार्डवरचा जुना फोटो अपडेट करून घ्या