15 लाखापर्यंतचे बँक कर्ज, 4.5 लाखापर्यंतचा व्याजाचा परतावा; महिलांसाठी खास 'आई' कर्ज योजना...

Pradeep Pendhare

'आई' कर्ज योजना

महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन विभागामार्फत महिलांसाठी 'आई' (AAI) कर्ज योजना सुरू आहे.

AAI Loan Scheme | Sarkarnama

बिनव्याजी कर्ज

या योजनेद्वारे पर्यटन व्यवसायासाठी 15 लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज दिले जाते.

AAI Loan Scheme | Sarkarnama

मुख्य फायदा

यात मिळणाऱ्या 15 लाखापर्यंतचे बँक कर्जावर 4.5 लाख रुपयांपर्यंतचा व्याजाचा परतावा थेट सरकारकडून दिला जातो. यामुळे कर्ज बिनव्याजी होते.

AAI Loan Scheme | Sarkarnama

व्यवसाय प्रकार

होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी, हॉटेल, कृषी पर्यटन यांसारखे पर्यटनाशी संबंधित ४१ पेक्षा जास्त व्यवसाय यात समाविष्ट आहेत. कर्जाची परतफेड कालावधी साधारणपणे ७ वर्षांपर्यंतचा आहे.

AAI Loan Scheme | Sarkarnama

रहिवासी दाखला

अर्जदार महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी. तिचे वय 21 ते 60 वर्षांच्या दरम्यान असावे. व्यवसाय पर्यटनाशी संबंधित आणि महिलेच्या नावावर नोंदणीकृत असावा.

AAI Loan Scheme | Sarkarnama

तीन घटक महत्त्वाचे

अर्जदार महिला, त्यांचा पर्यटन व्यवसाय आणि कर्ज देणारी बँक हे तिन्ही घटक महाराष्ट्र राज्यातच स्थित असावेत.

AAI Loan Scheme | Sarkarnama

नोंदणीसाठी

अधिकृत आई धोरण पोर्टलवर नोंदणी करताना, आधार कार्ड, पॅन कार्ड, ओळखपत्र आणि निवास दाखला लागतो.

AAI Loan Scheme | Sarkarnama

प्रकल्प अहवाल

व्यवसायाचा प्रकल्प अहवाल आणि व्यवसाय नोंदणीचे कागदपत्र. जिल्हा पर्यटन कार्यालय किंवा संबंधित बँकेशी संपर्क साधून अधिक माहिती मिळवता येते.

AAI Loan Scheme | Sarkarnama

ही अटक महत्त्वाची

व्यवसायातील एकूण व्यवस्थापकीय व इतर कर्मचाऱ्यांपैकी किमान 50 टक्के कर्मचारी महिला असणे बंधनकारक आहे.

AAI Loan Scheme | Sarkarnama

NEXT : शेतकऱ्यांशी निगडीत राज्य व केंद्राच्या योजना चर्चेत.....

येथे क्लिक करा :