AAP Star Campaigners : लोकसभा निवडणुकीसाठी 'AAP'कडून असणार 'हे' स्टार प्रचारक!

सरकारनामा ब्युरो

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांच्या नावाचा स्टार प्रचारकांमध्ये समावेश करण्यात आला आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना आम आदमी पार्टीने स्टार प्रचारक बनवले आहे.

दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि ईडीच्या ताब्यात असणारे मनीष सिसोदिया यांनाही स्टार प्रचारक बनवलं गेलं आहे.

आम आदमी पार्टीच्या फायर ब्रॅण्ड नेत्या आतिशी यांचेही नाव अपेक्षेप्रमाणे स्टार प्रचारकांच्या यादीत आहे.

आम आदमी पार्टीचे नुकतेच तुरुंगातून बाहेर आलेले नेते संजय सिंह यांचाही स्टार प्रचारकांचा यादीत समावेश आहे.

दिल्लीचे मंत्री गोपाल राय हे सुद्धा आम आदमी पार्टीचे स्टार प्रचार असणार आहे.

सत्येंद्र जैन यांच्या रूपाने आम आदमी पार्टीने आपल्या आणखी एका नेत्याला स्टारप्रचारक केलं आहे.

कैलाश गेहलोत यांनाही स्टार प्रचारक म्हणून आम आदमी पार्टीने मैदानात उतरवण्याचं ठरवलं आहे.

सौरभ भारद्वाज यांच्या रूपाने आम आदमी पार्टीने आपला तरुण चेहराही स्टार प्रचारक केला आहे.

NEXT : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली बॉलिवूड 'भाईजान' ची भेट