खासदार राघव चढ्ढा बनले blinkit डिलिव्हरी बॉय! फोटो व्हायरल झाल्यानं सगळे आवाक्

Amit Ujagare

राज्यसभा खासदार

आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांनी आपल्या सोशळ मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत ते ब्लिंकइट डिलिबॉयच्या वेशात दिसत आहेत.

Raghav Chddhav

डिलिव्हरी बॉय

डिलिव्हरी बॉय बनून ते घरोघरी डिलिव्हरी देण्याचं काम करत असल्याचं या व्हिडिओतून स्पष्टपणे दिसत आहे, त्यामुळं लोकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

Raghav Chddhav

१० मिनिटांत डिलिव्हरी

डिलिव्हरी बॉयचे कपडे परिधान करण्यापासून दिलेल्या वेळेत म्हणजे फक्त १० मिनिटांत ग्राहकाच्या दारावर पोहोचण्याची किमया त्यांच्या या व्हिडिओमध्ये दिसत आहे. शेवटी स्टे ट्यून असंही त्यांनी म्हटलं आहे.

Raghav Chddhav

का करतात?

त्यामुळं सहाजिकच यापुढेही ते आणखी एखादा व्हिडिओ शेअर करण्याची शक्यता असून यामध्ये ते आपण हे काम का करतोय? हे ते स्पष्ट करतील.

Raghav Chddhav

काय येतात अडचणी

तरीही त्यांच्या या कृतीमागे ब्लिंकइटचे डिलिव्हरी बॉयला डिलिव्हरी पोहोचवण्यापर्यंत काय काय अडचणींचा सामना करावा लागतो हे जाणून घेणं आहे.

Raghav Chddhav

ब्लिंकइट पॉलिसीला विरोध

खासदार राघव चढ्ढा यापूर्वी राज्यसभेत ब्लिंकइटच्या १० मिनिट पॉलिसीविरोधात आपली भूमिका मांडली आहे. दहा मिनिटांत डिलिव्हरी हे अत्यंत घातक धोरण असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

Raghav Chddhav

अपघाताला निमंत्रण

कारण इतक्या कमी वेळेत थेट ग्राहकापर्यंत वस्तू घेऊन जाणं हे अपघाताला निमंत्रण देण्यासारखं आहे. म्हणजेच ब्लिंकइटचे डिलिव्हरी बॉय हे स्वतः अपघाग्रस्त होऊ शकतात आणि इतरांना देखील इजा पोहोचवू शकतात.

Raghav Chddhav

कौतुकाचा वर्षाव

ज्या युजर्सनं राघव चढढांचा हा व्हिडिओ पाहिला आहे, त्यांनी खासदारांना सलाम केला आहे. नेता असावा तर असा जामिनीवर उतरुन प्रश्न जाणून घेणं याला म्हणतात असं एकानं म्हटलं आहे.

Raghav Chddhav_Parinitee Chopra