Rajanand More
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी विभव कुमार यांनी केलेल्या मारहाणप्रकरणी मालीवाल पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या आहेत.
प्रेमाने मागितला असता तरी जीवही दिला असता. खासदारकी तर खूप छोटी गोष्ट आहे. पण आता कितीही ताकद लावली तरी मी राजीनामा देणार नाही, असे स्पष्ट केले.
माझी बदनामी केलीे. मी संसदेतील सर्वात तरूण सदस्य. मी खूप प्रामाणिकपणे काम करून एक चांगले खासदार कसे असतात, हे दाखवून देईन, असा विश्वास.
2006 मध्ये नोकरी सोडून केजरीवालांशी जोडली गेली आहे. जमिनीवर काम करत आले आहे. 2006 ते 2012 पर्यंत सर्व कामांमध्ये मी महत्वाचा भाग होते.
विभव कुमार यांना 2006 पासून ओळखते. ते अरविंद केजरीवाल यांचे सर्वात जवळचे आणि विश्वासू आहेत.
विभव कुमार पक्षात खूप पॉवरफुल आहेत. पक्षातील सर्व नेते त्यांना घाबरत असल्याचा दावाही मालीवाल यांनी केला आहे.
केजरीवालांच्या घरात चीरहरण झाले असून रोज चारित्र्यहनन होत आहे. त्यासाठी रोज पत्रकार परिषद घेतली जात आहे. मला ट्रोल केले जात असल्याचा आरोप.
एफआयआरमधील प्रत्येक शब्द खरा आहे. मी पॉलीग्राफ, नार्को टेस्ट करायलाही तयार आहे. ही लढाई माझी एकटीचीच आहे, असेही मालीवाल म्हणाल्या.