Ganesh Thombare
आम आदमी पार्टी हा पक्ष भारतातील मान्यताप्राप्त राष्ट्रीय राजकीय पक्ष बनला आहे.
आम आदमी पार्टी हा पक्ष अरविंद केजरीवाल व इतर समविचारी लोकांनी स्थापन केला आहे.
अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पक्षाची अधिकृत घोषणा 26 नोव्हेंबर 2012 रोजी दिल्लीतील जंतर मंतर येथे करण्यात आली.
भारतातील वाढता भ्रष्टाचार दूर करणे, जनलोकपाल विधेयक पारित करणे, निवडणूक पद्धतीत सुधारण करणे, सत्तेचे विकेंद्रीकरण करणे हे 'आप'चे मुख्य उद्देश आहेत.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल यांच्च्यातील मतभेदानंतर केजरीवालांनी आम आदमी पक्षाची घोषणा केली.
डिसेंबर 2013 मध्ये दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत 'आप'ने 70 पैकी 69 जागांवर उमेदवार उभे केले होते. त्यापैकी 28 जागांवर विजय मिळाला होता.
2015 ला दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाने 70 जागांवर आपले उमेदवार उभे केले. त्यापैकी 67 जागांवर विजय मिळवून दिल्लीत सरकार स्थापन केले.
आम आदमी पार्टी आता दिल्लीनंतर पंजाबमध्येही सत्तेत आली. या शिवाय 'आप'ने पहिल्यांदाच गोव्यातही दोन जागांवर विजय मिळवला.
केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी (दि.10 एप्रिल) आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा बहाल केला.