Deepak Kulkarni
पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत मातब्बरांना पराभवाचा धक्का देत अभिजित पाटील हे राज्याच्या राजकारणात चर्चेत आले होते.
पाटील यांनी रविवारी(दि.७) ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे अभिजीत पाटील २०२४ मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असतील असे स्पष्ट संकेत पवारांनी यावेळी दिले आहे.
मागील काही दिवसांपासून त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा रंगली होती.
साखर कारखाना क्षेत्रातील पाटील हे मोठं नाव म्हणून समोर आलं आहे.
राज्यातील तब्बल पाच साखर कारखाने चालवत आहेत.
अभिजीत पाटील यांनी पंढरपूर-मंगळवेढ्यामधून आगामी विधानसभेची तयारी सुरु केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांबरोबरच त्यांचा भाजपशीही दोस्ताना होता, त्यामुळे अभिजित पाटील नेमके कुणाचे, असा प्रश्न विचारला जात होता, त्याला आज उत्तर मिळाले आहे.
निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करुन उमेदवारी पक्की करुन घेण्याच्या दृष्टीनेही अभिजीत पाटील गटाने आज अखेर राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
आगामी काळात पंढरपुरात भाजप विरुद्ध राष्ट्रवादीकडून अभिजित पाटील असा सामना पाहायला मिळू शकतो.