Amol Kolhe Birthday : अभिनेते ते खासदार डॉ. अमोल कोल्हेंची अशी आहे राजकीय कारकीर्द

Rashmi Mane

वाढदिवस

अभिनयासोबतच राजकारणातही आपला ठसा उमटवणारे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा आज 43 वा वाढदिवस.

Amol Kolhe | Sarkarnama

ऐतिहासिक भूमिका

अभिनय क्षेत्रात कोल्हे यांनी अनेक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक भूमिका साकारल्या आहेत.

Amol Kolhe | Sarkarnama

भूमिका

छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांची भूमिका साकारल्यामुळे अमोल कोल्हे यांनी महाराष्ट्रातील लोकांच्या मनात घर केलं.

Amol Kolhe | Sarkarnama

कारकीर्द

डॉक्टर, त्यानंतर अभिनय क्षेत्रात दमदार कामगिरी आणि लोकप्रिय खासदार असा त्यांचा प्रवास आहे.

Amol Kolhe | Sarkarnama

जायंट किलर

२०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत शिरूर मतदारसंघात निवडणूक जिंकलेले. राष्ट्रवादीचे जायंट किलर खासदार डॉ. अमोल कोल्हे हे कायमच चर्चेचा विषय असतात. 

Amol Kolhe | Sarkarnama

शिवसेनेत प्रवेश

2014 च्या निवडणुकीपूर्वी कोल्हे यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. परंतु , 2019 च्या निवडणुकीपूर्वी शिवसेनेला जोरदार धक्का देत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

Amol Kolhe | Sarkarnama

शिरूर मतदारसंघातून

राष्ट्रवादीकडून अमोल कोल्हे यांना शिरूर मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरवण्यात आले होते.

Amol Kolhe | Sarkarnama

घवघवीत यश

कोल्हे यांनी शिवसेनेकडून तीन टर्म खासदार राहिलेल्या शिवाजीराव अढळराव पाटील यांचा पराभव करत घवघवीत यश संपादन केले होते.

Amol Kolhe | Sarkarnama

आमदारालाही दंड भरायला लावणारी कोण आहे IAS तेजस्वी राणा ?