Mumbai Road Scam: रस्ते घोटाळ्याप्रकरणी आदित्य ठाकरेंनी शिंदेंवर उठवलेले 'हे' आहेत दहा प्रश्न!

सरकारनामा ब्यूरो

मुंबई महानगरपालिकेत रस्ते घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे. 

Aditya Thackeray | Sarkarnama

रस्ते घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या विषयी शिंदे सरकारला 10 प्रश्न विचारत, जोरदार हल्लाबोल केला आहे.

Eknath Shinde | Sarkarnama

1 - मुंबईवर प्रशासक असताना ४०० किमीच्या ६०८० कोटी रु. इतक्या प्रचंड किमतीच्या रस्त्यांची कामं, हा प्रस्ताव कोणी दिला ?

Aditya Thackeray | Sarkarnama

2 - आधीच मुंबईत सुरू असलेल्या कामांमुळे गैरसोय होत असताना पावसाळ्याआधी ही कामं पूर्ण होतील का?

Aditya Thackeray | Sarkarnama

3 - महानगरपालिकेत नगरसेवकांचा कालावधी संपलेला असतांना परस्पर ६०८० कोटी रुपयांच्या निविदा काढणं लोकशाहीत बसत का ?

Aditya Thackeray | Sarkarnama

4 - मुंबईकरांचे मेहनतीचे ६०८० कोटी रुपये तुम्ही कुठल्या बजेटमधून वापरणार ?

Aditya Thackeray | Sarkarnama

5 - रस्त्यांच्या कामांसाठी वेगवेगळ्या संस्थांकडून लागणाऱ्या परवानगी आणि NOC मिळाल्या आहेत का? एक काम करताना दुसरी अडचण निर्माण झाली तर जबाबदार कोण?

Aditya Thackeray | Sarkarnama

6 - BMC ने ठरवलेल्या किमतीपेक्षाही अधिक बोली लावणाऱ्या कंत्राटदारांना काम दिलेच कसे ? मागितलेल्या सरासरी ८% वाढीबद्दल 'negotiate' का केल्या नाहीत ?

Aditya Thackeray | Sarkarnama

7 - कंत्राटदारांनी मागितले म्हणून पैसे वाढवले ? खोके सरकार कंत्राटदारांसाठी काम करते की मुंबईकरांच्या हितासाठी ?

Aditya Thackeray | Sarkarnama

8 - शहरात नागरिकांना त्रास न होता, वाहतुकीला अडथळा निर्माण न करता रस्ते बांधणे सोपे नसते...

Aditya Thackeray | Sarkarnama

9 - अंधेरीच्या गोखले पुलासाठी 'VJTI' आणि 'IIT' या संस्थांनी दिलेला अहवाल केराच्या टोपलीत टाकलात, तर आता ह्या कामासंदर्भात त्यांनी सूचना केल्या तर त्या ऐकून तरी घेतल्या जातील का?

Aditya Thackeray | Sarkarnama

10 - ही टोळधाड आहे हे स्पष्टपणे दिसत आहे. बरोबर ५ कंत्राटदारांना ५ कामे मिळाली आहेत. ह्या निविदांमधले आकडेच दाखवून देत आहेत की, परस्पर सामंजस्यातूनच हे घडले आहे.

Aditya Thackeray | Sarkarnama