Political News : 'या' प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केली राजकारणात एन्ट्री

Sachin Waghmare

श्रीनिवास पाटील

शरद पवारांचे खास मित्र माजी सनदी अधिकारी जिल्हाधिकारी पदांवर काम केले, त्यांनी सातारा लोकसभेची पोटनिवडणूक जिंकली.

shrinaivas patil | Sarkarnama

प्रताप दिघावकर

माजी पोलीस अधिकारी प्रताप दिघावकर यांनी ऑगस्ट 2023 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला असून, ते धुळे लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे.

Pratap Dighavakar | Sarkarnama

प्रदीप शर्मा

इन्काऊंटर स्पेशालिस्ट अशी ओळख असलेल्या प्रदीप शर्मा यांनी 2019 मध्ये शिवसेना पक्षाकडून नालासोपारा विधानसभेची निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांचा पराभव झाला होता.

Paradip sharma | Sarkarnama

अभिमन्यू पवार

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक राहिलेले अभिमन्यू पवार यांनी 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीतून एन्ट्री झाली. ते औसा मतदारसंघाचे आमदार आहेत.

Abhimanyu Pawar | Sarkarnama

श्रीकांत भारतीय

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी ओएसडी म्हणून काम पाहिले होते. आता ते भाजपचे विधान परिषदेचे आमदार आहेत.

Shrikant Bhartiya | Sarkarnama

सुमित वानखेडे

देवेंद्र फडणवीस यांचे खासगी सचिव राहिलेल्या सुमित वानखेडे यांच्यावर सध्या वर्धा लोकसभा मतदार संघाचे निवडणूक प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. आर्वी विधानसभा मतदार संघातून तयारी देखील सुरू केलीय.

Sumit Wankhede | Sarkarnama

राधेश्याम मोपलवार

माजी सनदी अधिकारी मोपलवार यांनी मुख्यमंत्री वॉर रुमच्या महासंचालकपदाचा राजीनामा दिला. लवकरच ते राजकारणात एन्ट्री करतील अशी चर्चा आहे.

Radheshym Moplawar | Sarkarnama

डॉ. जनार्दन वाघमारे

हे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडचे पहिले कुलगुरू होते. त्यानंतर काही काळ ते लातूरचे नगराध्यक्ष होते.

Janardhan Waghmare | Sarkarnama

ऋतुजा लटके

मुंबई महानगरपालिकेच्या परिमंडळ 3 कार्यालयात त्या कार्यकारी सहाय्यक म्हणून कार्यरत होत्या. अंधेरी पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणुकीत विजयी झाल्या.

Rutuja Latke | Sarkarnama

NEXT : PM मोदींनी विचारले, " सरकारची कामगिरी कशी होती?"

येथे क्लिक करा..