Rajanand More
यूट्यूबर आणि पॉडकास्टर रणवीस अलाहबादिया पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. इंडियाज गॉट लेटेंट या शोमधील वादग्रस्त विधानामुळे त्यांच्यावर मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई हायकोर्टातील प्रसिध्द वकील अभिनव चंद्रचूड यांच्या मार्फत अलाहबादियाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.
अलाहबादियाविरोधात दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी चंद्रचूड यांनी याचिकेत केली आहे. तसेच त्यावर लवकर सुनावणी घेण्याची विनंतीही केली आहे.
अभिनव चंद्रचूड हे नामांकित वकील असून सध्या ते मुंबई हायकोर्टात वकिली करतात. भारताचे माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे त्यांचे वडील आहेत.
भारताचे सर्वाधिक काळ सरन्यायाधीश राहिलेले यशवंत विष्णू चंद्रचूड हे त्यांचे आजोबा आहेत.
वडील सरन्यायाधीश असताना अभिनव यांनी सुप्रीम कोर्टात एकही केस लढवली नाही. निष्पक्ष निकाल लागावेत, हा त्यामागचा उद्देश होता.
मुंबईतील शासकीय विधी महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली. तर हार्वर्ड लॉ स्कूलमधील पदव्युत्तर पदवी मिळवली आहे. तसेच स्टॅनफोर्ड लॉ स्कूलमधून डॉटर्स ऑफ द सायन्स ऑफ लॉ ही पदवी संपादन केली आहे.
अभिनव यांनी 2014 पासून मुंबई उच्च न्यायालयात वकिली सुरू केली. त्याआधी ते अमेरिकेतील गिब्सन, डन आणि क्रचर या लॉ फर्ममध्ये असोसिएट अटर्नी म्हणून कार्यरत होते.
अभिनव यांची केवळ वकील म्हणूनच नव्हे तर लेखक म्हणूनही कायद्याच्या क्षेत्रात ओळख आहे. त्यांची काही पुस्तके, शोधनिबंध, लेख प्रसिध्द झाले आहेत.