Deepak Kulkarni
टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्सचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनी हा टेरिटोरियल आर्मीचा सदस्य आहे.
टेरिटोरियल आर्मी निमलष्करी दल असून यातील जवानांना पूर्णवेळ सेवा देण्याची बंधन नसतं. हे जवान नोकरी करु शकतात. पण गरजेच्या वेळी त्यांना सैन्यदलाची मदत करावी लागते.
आता भारताचा गोल्डन बॉय ऑलिंपिक विजेता नीरज चोप्राही त्याच सैन्य दलाचा भाग होणार आहे.
नीरज चोप्राला टेरिटोरियल आर्मीमध्ये लेफ्टनंट कर्नल पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याला लवकरच सैन्यदलाची वर्दी मिळणार आहे.
भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून नीरज चोप्राला लेफ्टनंट कर्नलपदी नियुक्ती देण्यात आली आहे. यापू्र्वी नीरज चोप्रा राजपूताना रायफल्समध्ये सुभेदार पदावर कार्यरत होते.
2016 साली नीरज हे नायब सुभेदार पदावर भारतीय सैन्य दलात भरती झाले होते. आता, त्यांना बढती मिळाली असून थेट लेफ्टनंट कर्नल बनले आहेत.
नीरज चोप्राने भारतासाठी 2021 च्या टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्ण आणि 2024 च्या पॅरीस ऑलिंपिक स्पर्धेत सिल्व्हर पदक जिंकले आहे.
भारतीय टेरिटोरियल आर्मी रेग्युलेशन 1948 च्या Para-31 नुसार नीरज यांची सैन्यदलात समावेश करण्यात आला आहे.
नीरजने याच वर्षी टेनिस खेळाडू हिमानी मोर हिच्यासोबत लग्न केले.