Who Is Ujjwal Nikam: 'त्या' खटल्यानंतर उज्वल निकम यांनी पुन्हा मागे वळून पाहिलं नाही...

अनुराधा धावडे

कोण आहेत उज्वल निकम?

राज्य आणि देशपातळीवर गाजलेले हायप्रोफाईल खटले चालवणारे ज्येष्ठ विधीज्ञ उज्वल निकम हे आपल्या सर्वांच्याच परिचयाचे आहेत

Ujjwal Nikam | Sarkarnama

जळगाव न्यायालय

उज्वल निकम यांनी जळगावात वकिलीच शिक्षण पूर्ण केलं आणि जळगाव न्यायालयातच सरकारी वकील म्हणून काम पाहिलं

Ujjwal Nikam | Sarkarnama

मुंबई बॉम्बस्फोट प्रकरण

सरकारी वकील म्हणून 1993 मुंबई बॉम्बस्फोट खटल्यामुळे उज्वल निकम यांच्या कारकिर्दीला खऱ्या अर्थाने कलाटणी मिळाली.

Ujjwal Nikam | Sarkarnama

मुंबई बॉम्बस्फोट

13 मार्च 1993 रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्ररकरणी  तत्कालिन सरकारने या खटल्यासाठी उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली.

Ujjwal Nikam | Sarkarnama

चौदा वर्षे

मुंबई बॉम्बस्फोटाचा हा खटला जवळपास चौदा वर्षे म्हणजे २००७ पर्यंत चालला

Ujjwal Nikam | Sarkarnama

उज्वल निकम यांचे गाजलेले खटले

1993 मुंबई बॉम्बस्फोट खटला, खैरलांजी हत्याकांड, 2008 मुंबई हल्ला, शक्ती मिल बलात्कार केस, प्रवीण महाजन, कोपर्डी बलात्कार आणि हत्या, यासांरखे अनेक गाजलेले खटले त्यांनी चालवले. मुंबई बॉम्बस्फोट खटल्यानंतर अंजना गावित प्रकरण, खैरलांजी या खटल्यांनंतर त्यांनी पुन्हा मागे वळून पाहिलं नाही.

Ujjwal Nikam | Sarkarnama

पद्मश्री पुरस्काराने गौरव

असे देशाचे लक्ष वेधणार खटले लढविणाऱ्या निकम यांना 2016 मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं

Ujjwal Nikam | Sarkarnama

झेड प्लस सुरक्षा

हायप्रोफाईल खटल्यामुळे निकम यांच्यावर हल्ला होण्याची भीती असल्याने, सरकारने त्यांना झेड-प्लस सुरक्षा पुरवली आहे.

Ujjwal Nikam | Sarkarnama

आक्रमक, अभ्यासू, डायनॅमिक पर्सनॅलिटी

डायनॅमिक पर्सनॅलिटीसाठीही उज्वल निकम ओळखले जातात. याशिवाय ते कोर्टात नेहमी आक्रमक असतात, असंही जाणकार सांगतात.

Ujjwal Nikam | Sarkarnama

IAS Pari Bishnoi: हरियाणाच्या आमदाराशी लग्नगाठ बांधणाऱ्या, कोण आहेत 'या' IAS अधिकारी?

Pari Bishnoi | Sarkarnama