Manoj Jarange : वय वर्षे 40, 17 दिवस उपोषण अन् आता अल्टिमेटम; कोण आहेत जरांगे पाटील ?

Rashmi Mane

मराठा समाजातील आक्रमक नेता

मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी चळवळीच्या माध्यमातून गेल्या १० ते १५ वर्षांपासून मनोज जरांगे पाटील काम करत आहेत. 

Manoj Jarange Maratha Protest Jalna | Sarkarnama

रहिवासी

मनोज जरांगे बीडमधील मातोरी गावचे आहेत, पण काही वर्षांपूर्वी ते जालना जिल्ह्यातील अंबडमधील अंकुशनगर येथे स्थायिक झाले. 

Manoj Jarange | Sarkarnama

शिक्षण

मनोज जरांगे यांचं शिक्षण 12 वीपर्यंत झालंय.

Manoj Jarange | Sarkarnama

चळवळीतील नेता

मनोज जरांगे २०११ पासून मराठा आरक्षण चळवळीत सक्रिय आहेत. बघता बघता मराठा समाजातील लढवय्या नेता म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.

Manoj Jarange | Sarkarnama

कौटुंबिक पार्श्वभूमी

पत्नी, चार मुलं, तीन भाऊ आणि आई-वडील असं मनोज यांचं कुटुंब आहे.

Manoj Jarange | Sarkarnama

हॉटेलमध्ये काम

हॉटेलमध्ये काम करत त्यांनी समाजकार्यात स्वतःला झोकून दिले. स्वतःच्या मालकीची चार एकर जमीनही त्यांनी मराठा आंदोलनासाठी विकली.

Manoj Jarange | Sarkarnama

संघटनेची स्थापना

जरांगे यांनी 2011 ला 'शिवबा' संघटनेची स्थापना करत, मराठा समाजासाठी अनेक आंदोलने केली आहेत.

Manoj Jarange | Sarkarnama

Next : UPSC परीक्षेत 5 वा रँक मिळवत रचला इतिहास ; जाणून घ्या सृष्टी देशमुख यांच्याबद्दल....

येथे क्लिक करा