Pradeep Pendhare
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या 'UPSC' परीक्षेत अहिल्यानगर जिल्ह्यातून चौघांनी यश मिळवलं.
यश मिळवणारे चौघेही सर्वसामान्य कुटुंबातील असून, ओंकार खुंटाळे, ज्ञानेश्वर मुखेकर, सौरव ढाकणे आणि अभिजित आहेर अशी त्यांची नावं आहेत.
नगर तालुक्यातील निंबळक इथला ओंकार खुंटाळे याने 673 व्या रँक मिळवली. पाचव्या प्रयत्नात त्याने 'UPSC'मध्ये यश मिळवले.
ओंकारची आई मीनाक्षी अंगणवाडीसेविका, तर वडील राजेंद्र देहरे विकास सेवा सोसायटीत सचिव आहेत.
पाथर्डीतील कोरडगाव इथला ज्ञानेश्वर मुखेकर याने 707 वी रँक मिळवली. यापूर्वी त्यानं दोनदा 'MPSC' परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे.
ज्ञानेश्वर याचे वडील शेतकरी, तर त्याची आई अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहे.
पाथर्डीतील ढाकणवाडी इथल्या सौरव ढाकणे याने 628वी रँक मिळवली. मुंबईतून सिव्हिल अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे.
पारनेरच्या पळसपूर इथला अभिजित आहेर याने 734वी रँक मिळवली. त्याने पाचव्या प्रयत्नात यश मिळवलं.
अभिजितचे वडील सहदेव प्राचार्य, तर आई प्रा. विजया प्राध्यापक आहे. अभिजित हा सिव्हिल अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे.