Rashmi Mane
'आयपीएल फायनल' दरम्यानचे रोहित पवार यांनी काही खास फोटो शेअर केले आहेत.
शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर, BCCI खजिनदार आशिष शेलार, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी संजय नाईक आणि अजिंक्य नाईक यांची भेट झाली, असं म्हणत रोहित पवार यांनी या भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या फोटोमुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
या सामन्यासाठी मुंबई ते अहमदाबाद खास विमानाने एकत्र प्रवास केला.
रोहित पवार आणि आशिष शेलार यांच्या भेटीचा योग नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियममध्ये जुळून आला आहे.
रोहित पवार यांनी 'आयपीएल'च्या ट्रॉफीसोबतचाही फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.