Rashmi Mane
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार एक दिवसाच्या नाशिक दौऱ्यावर आहेत.
अजित पवार यांनी साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ मानल्या जाणाऱ्या वणी येथील सप्तशृंगी मातेचं दर्शन घेतलं.
अजित पवारांसोबत मंत्री छगन भुजबळ, सुनील तटकरे तसेच राष्ट्रवादीचे आमदार उपस्थित होते.
अजित पवार नाशिकमध्ये पोहोचल्यावर कार्यकर्त्यांकडून त्यांचं ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात आलं.
अजित पवारांच्या या कळवण दौऱ्यात शेतकरी कृतज्ञता मेळाव्यासह विविध कार्यक्रम होणार आहेत.
सप्तशृंगी देवी संस्थानच्या वतीने तटकरे यांना सप्तशृंगी देवीची प्रतिमा देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं.
डोक्यावर टोपी, खांद्यावर शाल...अजितदादांनी सप्तशृंगी गडावर घेतलं देवीचं दर्शन.