Rashmi Mane
भारताच्या सुरक्षा यंत्रणेतील 'बापमाणूस' राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना हेरगिरीच्या जगातला खरा 'जेम्स बाँड' म्हटले जाते.
भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या लष्करी तणावाच्या पार्श्वभूमीवर अजित डोवाल यांची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. ते सतत लष्करप्रमुखांसोबत आणि पंतप्रधान मोदींसोबतच्या बैठकांमध्ये दिसतात.
जाणून घेऊया.. अजित डोवाल यांच्या शिक्षणाविषयी माहिती.
20 जानेवारी 1945 रोजी उत्तराखंडमधील पौडी गढवाल येथे जन्मलेल्या अजित डोवाल यांनी अजमेर मिलिटरी स्कूलमध्ये शिक्षण घेतले.
अजित डोवाल यांचे शालेय शिक्षण राजस्थानमधील अजमेर येथील किंग जॉर्ज रॉयल इंडियन मिलिटरी स्कूल (आताचे अजमेर मिलिटरी स्कूल) येथे झाले.
1967 मध्ये त्यांनी आग्रा विद्यापीठातून (आताचे डॉ. भीमराव आंबेडकर विद्यापीठ) अर्थशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी (M.A.) प्राप्त केली.
अजित डोवाल हे केरळमधील 1968 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. नियुक्तीनंतर अवघ्या चार वर्षांनी ते इंटेलिजेंस ब्युरो (IB) मध्ये सामील झाले आणि 2005 मध्ये संचालक पदावरून निवृत्त झाले.
वाजपेयी सरकारमध्ये मल्टी एजन्सी सेंटर आणि जॉइंट इंटेलिजेंस टास्क फोर्सचे प्रमुख म्हणून काम केल्यानंतर, त्यांना 2014 मध्ये देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बनवण्यात आले.