Rashmi Mane
उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच मंत्रालयात पोहोचले.
मंत्रालयात आल्यानंतर सर्वप्रथम मंत्रालयात छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ माँसाहेब, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
मंत्रालयात त्यांच्यासोबत छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, अदितीताई तटकरे, संजय बनसोडे, अनिल भाईदास पाटील आदी नेते उपस्थित होते
अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर ही पहिलीच मंत्रीमंडळाची बैठक आहे.
या पहिल्याच कॅबिनेट बैठकीत, राज्य सरकारने आठ मोठे निर्णय घेतले आहेत.
राज्य शासनाच्या वर्ष पूर्तीनिमित्त महत्त्वाच्या निर्णयांचा आढावा घेणाऱ्या "पहिले वर्ष सुराज्याचे" या निर्णय पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
त्यासोबतच 'लोकराज्य' या मासिकेचा मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.