सरकारनामा ब्यूरो
मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा नारीशक्ती मेळावा उत्साहात पार पडला.
या महिला मेळाव्याला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थिती लावली तसेच विविध जिल्ह्यांच्या महिलांनीही हजेरी लावली होती.
मेळाव्यादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार विविध लुकमध्ये दिसून आले.
सत्कार सोहळ्यावेळी त्यांना धनुष्यबाणाची प्रतिकृती देण्यात आली होती.
विविध जिल्ह्याच्या महिलांनी त्या भागातील प्रसिद्ध वस्तू आणि टोप्या देऊन पारंपारिक पद्धतीने अजित पवारांचा सत्कार केला.
कोळी, पुणेरी, वारकरी, ज्योतिबा फुले आणि आदिवासी अशा विविध रुपात त्यांचे स्वागत करण्यात आले.
मेळाव्यात त्यांनी सर्व महिला पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
'स्त्री शक्तीला सोबत घेऊन विकास करायचाय' असे यावेळी अजित पवारांनी म्हटले.
रुपाली चाकणकर यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते, यात इतरही अनेक नेते उपस्थित होते.