Booster dose : विधानसभेसाठी दत्तात्रेय भरणे, राजन पाटलांना 'ऊर्जा'

Vijaykumar Dudhale

अजित पवारांचा पुढाकार

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेत इंदापूर आणि मोहोळ मतदारसंघासाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या योजनांना मंजुरी दिली आहे.

Dattatray Bharane | Sarkarnama

जंक्शन एमआयडीसीसाठी शेती महामंडळाची जमीन

इंदापूर तालुक्यातील प्रस्तावित जंक्शन एमआयडीसीसाठी महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाची जमीन देण्याचा निर्णय

Dattatray Bharane | Sarkarnama

131 हेक्टर 50 आर जमीन देणार

महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या ताब्यातील सुमारे 131 हेक्टर पन्नास आर जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला हस्तांतरित करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे इंदापूर तालुक्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

Dattatray Bharane | Sarkarnama

दत्तात्रेय भरणेंना होणार फायदा

इंदापुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्तात्रेय भरणे हे आमदार आहेत. त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत या निर्णयाचा फायदा होण्याची शक्यता आहे.

Dattatray Bharane | Sarkarnama

मोहोळसाठी मोठा निर्णय

सर्वपक्षीय नेत्यांच्या एकीमुळे काहींसा अडचणीत आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यातील मोहोळ विधानसभा मतदारसंघासाठीही अजित पवारांनी मोठा निर्णय घेतला आहे.

Rajan Patil | Sarkarnama

आष्टी उपसा सिंचन योजनेसाठी सुप्रमा

आष्टी उपसा सिंचन योजनेसाठी 272 कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

Rajan Patil | Sarkarnama

3900 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार

आष्टी उपसा सिंचन योजनेमुळे मोहोळ तालुक्यातील अनगर परिसराच्या नऊ गावांतील 3 हजार 900 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे

Rajan Patil | Sarkarnama

यशवंत मानेंना फायदा

मोहोळमधून आमदार यशवंत माने यांना पुन्हा उमेदवारी मिळणार आहे. त्यांच्यासाठी आगामी निवडणुकीत आष्टी उपसा सिंचन योजनेच्या सुप्रमाचा फायदा होणार आहे.

Rajan Patil | Sarkarnama