अजित पवारांनी लॉन्च केला चॅटबॉट! सरकारी समस्यांवर थेट उपायांचा दावा

Amit Ujagare

हायटेक पद्धत

उपमुख्यमंत्री अजित पवार जनतेच्या समस्या आता हायटेक पद्धतीनं सोडवणार आहेत.

NCP Jansamvad

असा करा वापर

यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं व्हॉट्सअप चॅटबॉट विकसित केला आहे.

NCP Jansamvad

कसा वापरणार?

तक्रार नोंदवण्यासाठी आणि आपल्या समस्येचं निराकारण करुन घेण्यासाठी हा चॅटबॉट कसा वापरायचा याची माहिती राष्ट्रवादीनं जाहीर केली आहे.

NCP Jansamvad

कधीपर्यंत तोडगा?

एकदा तक्रार नोंदवल्यानंतर ती पुढे कुठल्या डेस्कवर जाईल, त्यावर कधीपर्यंत निर्णय होईल आणि कोण निर्णय घेईल? याची माहिती चॅटबॉटमध्ये मिळून जाईल.

NCP Jansamvad

तक्रार क्रमांक

त्यानंतर जेव्हा राष्ट्रवादीकडून जनसंवाद कार्यक्रम घेतला जाईल तेव्हा तुम्ही चॅटबॉटवर नोंदवलेला तक्रार क्रमांक घेऊन जायचं, तिथं अधिकारी वर्ग तुमची समस्या ऐकणार आणि त्यावर कारवाईची माहिती देतील.

NCP Jansamvad

चॅटबॉटचा वापर

त्यामुळं जनतेच्या कुठल्याही तक्रारी असल्या तरी त्यांनी थेट अजित पवारांशी जोडून घेण्यासाठी चॅटबॉटचा वापर जरुर करावा, असं आवाहन राष्ट्रवादीनं केलं आहे.

NCP Jansamvad

समस्या सोडवणं प्राथमिकता

जनतेच्या समस्या वेळेत सोडवणं हीच सरकारची आणि नेतेमंडळीची प्राथमिकता असायला हवी त्यासाठी विविध उपाययोजना करणं गरजेचं आहे.

NCP Jansamvad