Rashmi Mane
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत.
आगामी निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही पक्षांकडून तयारी सुरू झाली आहे. बैठका आणि चर्चेचा फेरा सुरू झाला आहे.
त्यातच मंगळवारी एनडीए म्हणजेच भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांची दिल्लीत बैठक झाली.
काल (18 जुलै ) बैठकीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच प्रफुल्ल पटेलही दिल्लीत गेले होते.
यावेळी अजित पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा, प्रफुल्ल पटेल यांच्यात सुमारे अर्धा तास चालली चर्चा झाल्याची बातमी समोर येत आहे.
या भेटीबाबत राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत.
या बैठकीत काय चर्चा झाली, याचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.
एनडीएची बैठक संपवून पंतप्रधान मोदी निघाले तेव्हा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल त्यांना गाडीपर्यंत भेटायला गेले होते.