सरकारनामा ब्यूरो
ग्रामीण भागाची चांगली जाण असलेला तसेच तळागाळापर्यंत पोहोचलेला नेता म्हणून त्यांची ओळख आहे.
अजित पवार यांचा जन्म २२ जुलै १९५९ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे झाला.
महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून सहकारी संस्थांच्या माध्यमातून राजकीय कारकिर्दीला सुरवात झाली.
अजित पवार हे राष्ट्रवादीचे सर्वोसर्वा शरद पवार यांचे पुतणे आहेत.
बारामती तालुक्यातील प्रत्येक गावात अगदी सुरवातीपासून अजित पवार यांचा संपर्क आहे. व्यापक जनसंपर्क हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.
१९९१ साली पहिल्यांदा अजित पवार बारामतीमधून लोकसभेवर निवडून गेले.
अजित पवार सलग पाच वेळा विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेले. राज्यमंत्री, मंत्री, उपमुख्यमंत्री अशी अनेक पदे त्यांनी भुषवली आहेत.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात उपमुख्यमंत्री म्हणून सक्षमपणे काम केल्यानंतर, आता ते विरोधीपक्ष नेते म्हणून काम करत आहेत.