Maharashtra Budget : वारकरी-संतांसाठी अजितदादांनी कोणत्या योजना जाहीर केल्या

Vijaykumar Dudhale

मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ

महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकऱ्यांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळा’ची घोषणा

Ajit Pawar

जागतिक नामांकन

पंढरपूर वारीचा जागतिक नामांकनासाठी ‘युनेस्को’ कडे प्रस्ताव पाठविण्यात येणार

Ajit Pawar

दिंड्यांना 20 हजार रुपयांचे अर्थसाह्य

वारीतल्या मुख्य पालख्यांमधील दिंड्यांना प्रतिदिंडी 20 हजार रुपयांचे अर्थसाह्य देण्यात येणार

Ajit Pawar

‘निर्मल वारी’

‘निर्मल वारी’साठी 36 कोटी 71 लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा

Ajit Pawar

आरोग्य तपासणी, मोफत औषधोपचार

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून देहू-आळंदी ते पंढरपूर या दोन्ही मुख्य पालखी मार्गावरील सर्व वारकऱ्यांची आरोग्य तपासणी, मोफत औषधोपचार करण्यात येणार

Ajit pawar

बाबा जुमदेवजी यांच्या स्मारकाचा विकास आराखडा

अध्यात्मिक गुरु तथा समाजसुधारक महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या स्मारकासाठी पावडदौना, तालुका मौदा, जिल्हा नागपूर येथे 77 कोटींचा विकास आराखडा तयार करणार

Ajit Pawar

नेवासा मंदिर परिसराचा विकास आराखडा

संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीची जिथे रचना केली, त्या नेवासा येथील मंदिर परिसराचा विकास आराखडा तयार करणार

Ajit pawar

रुपलाल महाराजांचे स्मारक

संत श्री रुपलाल महाराजांचे समाधीस्थळ असलेल्या अंजनगाव सुर्जी, जिल्हा अमरावती येथे त्यांचे स्मारक उभारण्यात येणार

Ajit Pawar

सागरिका घोष पुन्हा का आल्या चर्चेत; काय घडलं राज्यसभेत?

Sagarika Ghose