Pradeep Pendhare
वाराणसीच्या डॉ. आकांक्षा भास्कर IAS परीक्षेत 76 वा रँक मिळवली. 2015 मध्ये IAS अधिकारी बनल्या. नागरी सेवा परीक्षेत मेडिकल हा मुख्य विषय घेतला होता.
कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधून MBBS ची पदवी प्राप्त केली. आकांक्षा यांनी डॉक्टर होऊन आईवडिलांचे स्वप्न पूर्ण केलं.
पश्चिम बंगालमध्ये IAS अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या आकांक्षा या सुटीत रुग्णालयात जाऊन मोफत उपचार करतात.
डाॅक्टर होऊन फक्त रुग्णापर्यंत पोचू शकते. परंतु IAS झाल्यानंतर समस्यांपर्यंत पोचते, अशी आकांक्षा भास्कर यांची धारणा आहे.
कोविड काळात IAS आकांक्षा भास्कर यांनी नागरी सेवा आणि वैद्यकीय सेवेची सांगड घालत भरीव काम केले.
IAS अधिकारी म्हणून कार्यरत असताना आकांक्षा या पारदर्शकता, सुधारणा, नागरी सेवांवर अधिक भर देतात.
स्पर्धा परीक्षा अभ्यास करणाऱ्यांनी वेळ आणि ध्येय यांची सांगड घातल्यास यश मिळते. सेवेत आल्यानंतर देखील याच दोन गोष्टींवर काम केल्यास यश नक्कीच मिळते.
आकांक्षा भास्कर या नागरी सेवेत जरी असल्या, तरी ती प्रेमळ मुलगी, कर्तव्यदक्ष डॉक्टर आणि यशस्वी IAS अधिकारी म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली आहे.