Mayur Ratnaparkhe
पाकिस्तानी ड्रोन हल्ले हाणून पाडण्यात भारताच्या स्वदेशी बनावटीच्या 'आकाश' क्षेपणास्त्र प्रणालीने महत्त्वाची भूमिका बजावली.
आकाश क्षेपणास्त्र हवाई संरक्षण प्रणाली जमिनीवरून हवेत मारा करणारी भारताची सर्वात शक्तिशाली यंत्रणा म्हणून ओळखली जाते.
भारतीय लष्कर आणि हवाई दल दोघांकडेही पाकिस्तान सीमेवर ही क्षेपणास्त्र प्रणाली आहेत.
'आकाश' हे संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (DRDO) विकसित केले आहे.
'आकाश' बॅटरी क्षेपणास्त्र प्रणाली १८,००० मीटर उंचीवर ४५ किलोमीटर अंतरापर्यंत विमानांना लक्ष्य करू शकते.
'आकाश' क्षेपणास्त्र प्रणालीची सर्वात मोठी खासियत म्हणजे ती कुठेही वाहून नेता येते.
त्यात लढाऊ विमाने, क्रूझ क्षेपणास्त्रे आणि हवेतून जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्रे तसेच बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे यांसारख्या हवाई लक्ष्यांना निष्प्रभ करण्याची क्षमता आहे.
ते ट्रक किंवा टँकसारख्या वाहनांद्वारे नियंत्रण रेषा किंवा इतर सीमा ओलांडून वाहून नेले जाऊ शकते.