Mayur Ratnaparkhe
मोदी सरकारने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी आलोक जोशी यांची निवड केली आहे.
आलोक जोशी माजी रॉ प्रमुख आहेत, त्यांच्या खांद्यावर या महत्त्वाची धूरा असणार आहे.
आलोक जोशी देशाच्या सुरक्षेशीच्या बाबतीत सखोल माहिती आहे.
त्यांनी २०१२ ते २०१४ पर्यंत रॉ चे प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळलेली आहे.
यानंतर २०१५ ते २०१८ पर्यंत एनटीआरओचे चेअरमन म्हणूनही सेवा दिलेली आहे.
त्यांनी पाकिस्तान आणि नेपाळमधील अनेक महत्त्वपूर्ण ऑपरेशन्स पूर्ण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेली आहेत.
हरियाणात अनेक जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक राहिल्यानंतर ते प्रतिनियुक्तीवर रॉ मध्ये आले होते
ते प्रदीर्घकाळ परदेशातही राहिले आहेत. परदेशामधून परतल्यानंतर ते काही काळ हरियाणात पोलीस महानिरीक्षक पदावर राहिले
मात्र त्यानंतर लवकरच ते पुन्हा केंद्रात प्रतिनियुक्तीवर रॉ मध्ये परतले.
Next : UPSC त पहिल्या प्रयत्नात अपयश, दुसऱ्यांदा थेट भाटेपुरीतून लाल दिव्यापर्यंत शेकऱ्याच्या पोराची भरारी!