अनुराधा धावडे
केंद्रीय गृहमंंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर आले आहेत. लालबागच्या राजाचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीसांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली.
अमित शहा म्हणाले, मुंबईच्या राजकारणात फक्त भाजपचं वर्चस्व राहिलं पाहिजे
राजकारणात काही सहन करा. मात्र, धोका सहन करू नका. जे धोका देतात त्यांना योग्य ती शिक्षा झाली पाहिजे
वर्ष 2014 मध्ये केवळ दोन जागांसाठी शिवसेनेने युती तोडली होती. 2019 मधे पहिल्यांदा भाजपचे संपूर्ण बहुमताचे सरकार आले. असे पहिल्यांदाच झाले.
आता वेळ आली आहे उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवा. मुंबई महापालिका आपल्याला जिंकायची आहे.
२०१९ ला मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला नव्हता. तेव्हाही शिवसेनेनेच युती तोडली.
महापालिका निवडणूकांमध्ये भाजपचा १५० जागा जिंकायच्या आहेत. त्यासाठी रस्त्यावर उतरुन लोकांची कामे करा.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावावर, देवेंद्र फडणवीसांच्या कामावर मतं मागितली आणि जिंकले. तुम्ही जनतेचा विश्वासघात केला
पण आता महाराष्ट्रातले हिंदुविरोधी राजकारण आपल्याला संपवायचे आहे.