Jagdish Patil
बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन हे उत्तर प्रदेशातील अयोध्येत मोठी गुंतवणूक करत आहेत.
त्यांनी राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा झाल्यापासून रिअल इस्टेटमध्ये कोट्यवधींची गुंतवणूक केली आहे.
एका रिपोर्टनुसार, बच्चन यांनी अयोध्येत आता आणखी एक जवळपास 40 कोटींची जमीन खरेदी केली आहे. तर बच्चन यांची ही अयोध्येतील चौथी मालमत्ता आहे जी 25000 चौरस फूट क्षेत्रफळाची आहे.
त्यामध्ये 'द शरयू' प्रकल्पात 14.5 कोटींचा 10 हजार चौरस फूट भूखंड, हवेली अवध येथे 4.54 कोटींचा तर 54,000 चौरस फूट भूखंड हरिवंश राय बच्चन ट्रस्टच्या नावावर नोंद केला आहे.
राम मंदिरातील प्राण प्रतिष्ठानानंतर दिवसेंदिवस अयोध्येत भाविकांचा ओघ वाढल्यामुळे जमिनीच्या किमतीही गगनाला भिडू लागल्या आहेत.
रिअल इस्टेटमध् तेजी आल्याने जमिनीच्या किमती 19% च्या CAGR ने वाढल्या आहेत आणि पुढील 10 वर्षांत हा दर 25 % पर्यंत पोहोचू शकतात.
रस्ते, रेल्वे कनेक्टिव्हिटी आणि विमानतळांच्या विस्तारामुळे रिअल इस्टेटमध्ये तेजी आली आहे.
केवळ अयोध्येतच नाही तर मागील वर्षी अमिताभ आणि मुलगा अभिषेक बच्चन यांनी 24.95 कोटी किमतीच 10 अपार्टमेंट खरेदी केले आहेत.
हे फ्लॅट मुंबईतील मुलुंड पश्चिम भागात असून यामध्ये 3 आणि 4 बीएचके फ्लॅटचा समावेश आहे. यापैकी 6 फ्लॅट अभिषेकने आणि 4 अमिताभ बच्चन यांनी खरेदी केल्याची माहिती आहे.