Sachin Waghmare
जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार डॉ. कोल्हे यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला.
उमेदवारी अर्ज दाखल करताना सुप्रिया सुळे, बाळासाहेब थोरात, विश्वजित कदम, आ.अशोकबापु पवार, आ.सचिन अहिर, आ.संजय जगताप, आ. संग्राम थोपटे उपस्थित होते.
महाविकास आघाडी व इंडिया फ्रंट आघाडी लोकसभेच्या अधिकृत उमेदवारांची प्रचार शुभारंभाची सभा आज पुण्यात पार पडली.
निवडणुकीच्या प्रचारात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप, टीका टिप्पणी केली जात आहे.
महायुतीकडे कोणतेही धोरणात्मक मुद्दे नाहीत.
महायुतीच्या नेत्यांकडून वैयक्तिक टीका केली जात असल्याचा आरोप डॉ. कोल्हे यांनी केला आहे.
मला नटसम्राट म्हटले जाते, कार्यसम्राट परवडतो पण खोकेसम्राट, पलटीसम्राट चालत नाही.
तुम्ही जो निधी देणार म्हणून सांगता, तो तुमचा नाही तर जनतेचा पैसा आहे.
सत्तेची इतकी मस्ती, गुर्मी येते कोठून? असा थेट सवालही डॉ. कोल्हे यांनी केला आहे.
प्रचार करताना विकासाचे मुद्दे नसल्यानेच अशा पद्धतीने वैयक्तिक टीका होत असल्याचे डॉ. कोल्हे यांनी सांगितले.