Rashmi Mane
राज्यभरात 26 लाखांहून अधिक महिलांनी लाभ घेतलेल्या लाडकी बहीण योजनेत मोठी कारवाई सुरू झाली आहे. आता लाभार्थ्यांची घरोघरी जाऊन पडताळणी केली जाणार आहे.
या योजनेचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना मासिक आर्थिक मदत देणे हा होता. मात्र अनेक अपात्र महिलांनीही अर्ज करून लाभ घेतल्याचे समोर आले आहे.
अंगणवाडी सेविका लाभार्थ्यांच्या घरी जाऊन चौकशी करणार आहेत. महिलांकडून माहिती घेतल्यानंतर ती जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवली जाईल.
लाभार्थी महिला 21 ते 65 वयोगटातील असाव्यात. 65 वर्षांहून अधिक वयाच्या महिलांना लाभ बंद होणार आहे.
ज्या महिलांचा सरकारी नोकरीशी संबंध आहे त्यांचे अर्ज सरळ बाद करण्यात येणार आहेत.
संजय गांधी निराधार, नमो शेतकरी योजना यासारख्या अन्य योजनांचा लाभ घेतल्यास पात्रतेची पुन्हा चौकशी होणार आहे.
एका कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतल्यास चौकशी होणार आहे. तसेच, चारचाकी वाहन असलेल्या कुटुंबांचा लाभ बंद केला जाईल.
आयकर विभागाच्या माहितीनुसार, वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असलेल्या कुटुंबांना या योजनेपासून वगळले जाणार आहे.