सरकारनामा ब्यूरो
श्रीगोंदामध्ये अनुराधा नागवडे यांच्या पक्षप्रवेशामुळे अहिल्यानगर जिल्हाची जोरदार चर्चा सुरु आहे.
अनुराधा नागवडे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा तर्फे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतण्याची पूर्ण तयारी केली होती. मात्र.....
मात्र, महायुतीतून भाजपाची पहिली उमेदवार यादी जाहीर होताच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.
श्रीगोंदा तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे दिवंगत नेते शिवाजीराव नागवडे यांचे पुत्र राजेंद्र नागवडे यांच्या त्या पत्नी आहेत.
अनुराधा नागवडे यांनी राजकारणाची सुरुवात काँग्रेस पक्षातून केली, त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार पक्षामध्ये प्रवेश केला होता.
नागवडे या अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका देखील आहेत.
त्या महिला आघाडीच्या देखील त्या जिल्हाध्यक्ष होत्या.
राष्ट्रवादीतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात एन्ट्री घेतलेल्या नागवडे यांना उमेदवारी मिळते की नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.