सरकारनामा ब्यूरो
अनुरागसिंह ठाकूर हे हिमाचल प्रदेशचे असून, त्यांनी पंजाबमधून त्यांचं शिक्षण पूर्ण केले. त्यांचे वडील प्रेमकुमार धुमल हे हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री होते.
संसदेत उत्कृष्ट कामगिरीमुळे २०१९ मध्ये त्यांनी 'संसदरत्न' पुरस्कार मिळवला.
घरातील पार्श्वभूमीमुळे राजकारणात पाऊल ठेवणे त्यांच्यासाठी सोपे गेले. आपल्या वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. ते हमीरपूर आणि हिमाचल मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने ४ वेळा निवडून आले आहेत.
ठाकूर यांनी भारतीय संसदेत त्यांनी स्थायी समितीचे अध्यक्ष आणि लोकलेखा समितीचे सदस्य म्हणून काम केले आहे.
सोळाव्या लोकसभेचे मुख्य व्हीप म्हणून पद स्वीकारणारे ते सर्वात तरुण खासदार ठरले.
अनुरागसिंह यांनी सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात विविध उपक्रम राबवले. वर्ष 2010 मध्ये त्यांची भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
राजकारणात यशस्वी ठरलेले अनुराग सिंह यांनी राष्ट्रीय क्रिकेट संघात नेतृत्व केले आहे. त्यांनी 'बीसीसीआय'चे काही काळ अध्यक्षपदही सांभाळलेले आहे. अजूनही ते क्रिकेट व्यवस्थापनात सक्रिय आहेत. हिमाचल प्रदेश क्रिकेट संघटनेची जबाबदारीही त्यांच्याकडे आहे.
अनुराग सिंह ठाकूर यांचे पायाभूत सुविधा क्षेत्रातही चांगले योगदान आहे. 'विकासप्रिय नेता' अशी त्यांची जनतेमध्ये ओळख आहे.