सरकारनामा ब्युरो
महात्मा गांधी यांचे निकटवर्तीय कृपलानी यांची १९४७ मध्ये काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्यांनी मेरठ येथील काँग्रेसच्या अधिवेशनाची जबाबदारी पार पाडली होती.
पंडित नेहरू यांचे सहकारी पट्टाभी सीतारमैया १९४८-४९ मध्ये काँग्रेसचे अध्यक्ष होते.
१९५० मध्ये झालेल्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पुरुषोत्तम दास टंडन यांनी कृपलानी यांचा पराभव केला. नेहरु यांच्याशी झालेल्या मतभेदानंतर त्यांनी राजीनामा दिला.
१९५५ मध्ये यू.एन. ढेबर यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदावर निवड झाली. त्यांनी अमृतसर, इंदौर, गुवाहटी आणि नागपूर येथील अधिवेशनात अध्यक्षपद भूषवले.
१९६० मध्ये निवड झालेल्या नीलम संजीव रेड्डी यांनी तीन वेळा काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली.
के. कामराज १९६४-१९६७ या काळात काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यांनी भुवनेश्वर, दुर्गापूर आणि जयपूर येथील अधिवेशानात अध्यक्षपद भूषविले.
एस. निजलिंगप्पा १९६८-६९ या दरम्यान काँग्रेसच्या अध्यक्षपदी होते.
बाबू जगजीवन राम यांनी १९७०-७१ या काळात काँग्रेसच्या अध्यक्षपदी होते.
शंकर दयाल शर्मा १९७२-७४ दरम्यान काँग्रेसच्या अध्यक्षपदी होते.
देवकांत बरुआ यांनी १९७५-७७ या दरम्यान काँग्रेसचा कारभार पाहिला.
केसु ब्रम्हनंद रेड्डी यांनी १९७७-१९७८ या काळात काँग्रेसचे अध्यक्षपद सांभाळले.
पी. व्ही. नरसिंह राव यांनी १९९२ ते १९९६ या काळात काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली.
सीताराम केसरी यांनी १९९६ ते १९९८ या काळात काँग्रेसच्या अध्यक्षपदी होते.
२०२२ मध्ये काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत मल्लीकार्जुन खर्गे विजयी झाले. त्यांनी शशी थरूर यांचा पराभव केला.