Rashmi Mane
पोलिस म्हटलं की, आपल्या नजरेसमोर येतं सदैव सुरक्षेसाठी तैनात असलेले पोलिस अधिकारी.
पण आज आम्ही तुम्हाला अशा, अधिकाऱ्याबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी आपल्या कामासोबतच आपलं स्वप्नही पूर्ण केले आहे.
खांद्यावर तीन स्टार आणि डोक्यावर मिसेस इंडियाचा क्राऊन असणाऱ्या सहायक पोलिस आयुक्त प्रेमा पाटील यांच्याबद्दल...
देशभरातील स्पर्धकांना मागे सारत प्रेमा पाटील यांनी मानाचा किताब पटकावला होता.
प्रेमा पाटील या मूळच्या कराडच्या असून, त्यांचं शिक्षण एम.कॉम.पर्यंत झालं आहे.
गेल्या 15 वर्षांपासून प्रेमा पाटील या पोलिस दलात कर्तव्य बजावत आहेत.
शिवाजी विद्यापीठातून वाणिज्य शाखेची पदवी प्राप्त केली आहे. पाटील या २००७ पासून स्पर्धा परीक्षांची तयारी करत होत्या. राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर 2009 मध्ये त्या पोलिस सेवेत रुजू झाल्या.