Railway jobs 2025 : रेल्वेत नोकरी हवीये? 5,800 जागांसाठी मेगा भरती; ग्रॅज्युएशन झालेल्यांसाठी सुवर्णसंधी, असा करा अर्ज!

Rashmi Mane

सरकारी नोकरी

सरकारी नोकरी मिळावी असे अनेकांचा स्वप्न असतं, त्या तयारीत विद्यार्थी दिवस-रात्र मेहनत करतात.

Railway Apprentice Vacancy 2025 | Sarkarnama

भरती जाहीर

या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी म्हणजे रेल्वेमध्ये तब्बल 5810 पेक्षा जास्त जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Sikkim is the only Indian state without a railway network | Sarkarnama

अर्ज प्रक्रिया सुरु

रेल्वे भर्ती बोर्डाने (RRB) एनटीपीसीसाठी ही प्रक्रिया सुरू केली असून अर्ज करण्याची सुरुवात 21 ऑक्टोबरपासून झाली आहे.

Sikkim is the only Indian state without a railway network | Sarkarnama

अंतिम तारीख

इच्छुक उमेदवार www.rrbapply.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 नोव्हेंबर 2025 आहे.

Sikkim is the only Indian state without a railway network | Sarkarnama

या पदांसाठी भरती जाहीर

या भरतीत स्टेशन मास्टर, गुड्स ट्रेन मॅनेजर, ट्रॅफिक असिस्टंट, चीफ कमर्शियल, टिकट सुपरवायझर, सीनियर क्लर्क, टायपिस्ट अशा विविध पदांसाठी संधी आहे.

Railway Apprentice Vacancy 2025 | Sarkarnama

पात्रता

उमेदवाराला कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे. वयाची अट 18 ते 33 वर्षे आहे, तर ओबीसी, एससी, एसटी उमेदवारांसाठी सरकारी नियमांनुसार वयाची सवलत असेल.

Railway Apprentice Vacancy 2025 | Sarkarnama

अर्ज प्रक्रिया

अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी प्रथम संकेतस्थळावर लॉगिन करावे. जर नवीन अर्ज करत असाल तर ‘New Registration’ वर क्लिक करून ईमेल, मोबाइल नंबर व इतर माहिती भरावी लागेल.

Railway Apprentice Vacancy 2025 | Sarkarnama

अर्जात वैयक्तिक माहिती

अर्जात वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती, अर्ज केलेल्या पदाची माहिती, भाषा निवड, फोटो व सही अपलोड करणे आवश्यक आहे. फोटो व सही संकेतस्थळावर नमूद केलेल्या आकारानुसार अपलोड करणे गरजेचे आहे. शेवटी परीक्षा शुल्क भरणे व फॉर्म सबमिट करणे आवश्यक आहे.

RailOne app Indian Railways | Sarkarnama