Ashish Deshmukh Political Journey : आशिष देशमुखांचा काँग्रेस-भाजप- काँग्रेस प्रवास पूर्ण; आता पुढे काय ?

Deepak Kulkarni

उच्चशिक्षित

माजीमंत्री व काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांचे पुत्र असलेले डॉ. आशिष देशमुख उच्चशिक्षित आहेत.

Ashish Deshmukh Political Journey | Sarkarnama

भाजपमधून सुरुवात

वडील काँग्रेसचे नेते असले तरी त्यांची राजकीय कारकीर्द भाजपमधून सुरू झाली.

Ashish Deshmukh Political Journey | Sarkarnama

उमेदवारी

२०१४ मध्ये त्यांना भाजपने त्यांचे काका व राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्याविरुद्ध काटोल विधानसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी उमेदवारी दिली.

Ashish Deshmukh Political Journey | Sarkarnama

जायंट किलर...

अनिल देशमुखांचा पराभव करून प्रथमच विधानसभेची पायरी चढलेल्या आशीष देशमुख यांनी राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले होते.

Ashish Deshmukh Political Journey | Sarkarnama

भाजपला रामराम

पक्षात महत्त्व दिले जात नसल्याने अस्वस्थ देशमुख यांनी २०१८ मध्ये स्वतंत्र विदर्भाचा आणि शेतकऱ्यांचा प्रश्न उपस्थित करत विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देत भाजपला रामराम ठोकला.

Ashish Deshmukh Political Journey | Sarkarnama

काँग्रेसमध्ये प्रवेश

राहुल गांधी यांच्या उपस्थितीत वर्धा येथे एका कार्यक्रमात काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

Ashish Deshmukh Political Journey | Sarkarnama

लोकसभेच्या उमेदवारीसाठी प्रयत्न

काँग्रेसमध्ये आल्यावर त्यांनी २०१९ च्या लोकसभेच्या उमेदवारीसाठी प्रयत्न केले. परंतु ते सफल झाले नाही.

Ashish Deshmukh Political Journey | Sarkarnama

फडणवीस यांच्याविरोधात उमेदवारी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत नागपुरातील दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून पक्षाने थेट तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात उमेदवारी दिली.

Ashish Deshmukh Political Journey | Sarkarnama

फडणवीसांना जोरदार टक्कर

देशमुख यांना ऐनवेळी उमेदवारी मिळूनही त्यांनी फडणवीस यांना जोरदार टक्कर दिली होती. फडणवीस यांना ५० हजारपेक्षा कमी मताधिक्क्याने ही निवडणूक जिंकता आली.

Ashish Deshmukh Political Journey | Sarkarnama

काँग्रेसमधून निलंबन

काँग्रेस नेते राहुल गांधी व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात थेट विधानं केल्यानं देशमुख यांचं काँग्रेसमधून निलंबन करण्यात आलं असून त्यांना कारणे दाखवा नोटीस दिली होती.

Ashish Deshmukh Political Journey | Sarkarnama

राष्ट्रवादी व भाजप नेत्यांशी जवळीक....

देशमुख यांची राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप नेत्यांशी जवळीक वाढली होती.

Ashish Deshmukh Political Journey | Sarkarnama

भाजपसाठी देशमुख फायद्याचे ठरणार...

आता आशिष देशमुख यांची काँग्रेस पक्षातून ६ वर्षांसाठी निलंबन करण्यात आलं आहे. मात्र, सावनेर आणि काटोलमध्ये भाजपला तगडा उमेदवार हवा आहे. आशिष देशमुख हे भाजपसाठी फायद्याचे ठरू शकतात. 

Ashish Deshmukh Political Journey | Sarkarnama

NEXT : नुसरत जहाँ यांचा नवीन 'लुक' होतोय पुन्हा व्हायरल, पाहा खास फोटो!