सरकारनामा ब्यूरो
आशियातील पहिली महिला लोको पायलट सुरेखा यादव यांनी सोमवारी (१३ मार्च) 'सोलापूर ते सीएसएमटी' या मार्गावर 'वंदे भारत एक्स्प्रेस' चालवली.
'वंदे भारत एक्सप्रेस' ट्रेन चालवणाऱ्या त्या पहिल्या महिला लोको पायलट बनल्या आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ८ वर त्यांचा सत्कार करण्यात आला.
साताऱ्याच्या असलेल्या यादव यांनी 1988 साली पहिल्यांदा रेल्वे चालवली.
त्या केवळ भारताच्या नव्हे तर आशियातील पहिल्या महिला रेल्वे चालक आहेत.
त्यांच्या कामगिरीसाठी, त्यांना राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
सर्वात धोकादायक रेल्वे मार्ग समजल्या जाणाऱ्या पुण्यातील 'डेक्कन क्वीन ते सीएसटी' या मार्गावर ट्रेन ड्रायव्हिंग केले आहे.