Vijaykumar Dudhale
पूनम महाजन यांचा जन्म मुंबईत 9 डिसेंबर 1980 रोजी झाला. त्या प्रमोद महाजन यांच्या कन्या आहेत.
पूनम महाजन या वयाच्या 26 व्या वर्षी भाजपच्या प्राथमिक सदस्य झाल्या आणि त्यांच्या राजकीय जीवनाला सुरुवात झाली. पुढच्याच वर्षी म्हणजे एप्रिल 2007 मध्ये त्या भाजप युवा मोर्चाच्या राज्याच्या महासचिव झाल्या.
पूनम यांनी पहिली निवडणूक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे घाटकोपर विधानसभा मतदारसंघाचे तत्कालीन उमेदवार (सध्या भाजपचे आमदार) राम कदम यांच्या विरोधात 2009 मध्ये लढवली. मात्र, पहिल्याच निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्या पराभवानंतर त्यांचा राष्ट्रीय राजकारणात प्रवेश झाला.
भाजप युवा मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी पूनम महाजन यांची 2010 मध्ये निवड झाली. त्यानंतर 2013 मध्ये त्यांच्याकडे भाजपचे सचिवपद देण्यात आले होते.
पूनम महाजन यांनी काँग्रेसचा गड मानला गेलेल्या मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून प्रिया दत्त यांना पराभूत करत दणदणीत विजय मिळविला होता. स्वातंत्र्यानंतर प्रथमच या मतदारसंघात भाजपचा विजय झाला होता.
पूनम महाजन यांना 2016 मध्ये भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनविण्यात आले होते.
मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून पूनम महाजन यांनी 2019 मध्ये पुन्हा विजय मिळविला.
पूनम महाजन यांचा विवाह हैदराबाद येथील उद्योगपती आनंद राव यांच्याशी झाला आहे. त्यांना दोन मुले असून मुलगा आद्य राव आणि मुलगी अविका राव अशी त्यांची नावे आहेत.
सोशल मीडियावर 'फेमस' असणारे जगभरातील 9 प्रभावशाली नेते